Wednesday, December 13, 2017

संवाद

बोलणे वाऱ्यावरी अन् चंद्रदरवळ चांदणे
रात्र आहे. यत्न आहे, शांततेशी बोलणे

स्व:समर्पित ह्या क्षणांचे अंतरीशी बोलणे
वाहणे, भांबावणे अन् रक्तदुर्लभ थांबणे

वाट आहे एकली अन् गूढ-प्राचीन लक्षणे
त्या स्वयंभू भावनांचे भावनांशी खेळणे

सांडली स्वप्ने जरी, ना थांबले हे स्वप्नणे
व्यर्थ आहे, मान्य आहे, पण तरीही चालणे


पूर्वप्रसिद्धी: Sourabh 2017, annual magazine of MIT

No comments:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *