Tuesday, June 07, 2016

बसल्या बसल्या


कधी कधी वाटतं की नुसतं बसावं...

डोळे उघडूही नयेत अन् मिटूही नयेत.
श्वास सोडूही नये अन् घेऊही नये.
फक्त बसावं.

काहीच करु नये. कुठेच जाऊ नये.

खिडकीतून वारा येईल,
झाडांची पानं हलतील,
ते फक्त बघावं.
पचवावं.
परत बघावं.
परत पचवावं.
हा वारा कधी थांबूच नये असा विचार करावा.
थांबल्यावर,
परत वाहू नये असा धावा करावा.
तो वारा, ती पानं, ते आपण, असंच असावं.
विचार करत करत फक्त बसावं.

कुठलासा गंध येईल,
कसलासा आवाज येईल.
कुणीतरी कुठेतरी काहीतरी म्हणेल, कुणीतरी कुणालातरी काहीतरी सांगेल.
आवाजांमागून आवाज, ऐकत रहावं.
ऐकत ऐकत फक्त बसावं.

एखादी कविता आठवेल,
एखादं यमक जुळेल,
एखादी चाल सुचेल.
ती चाल मनात घोळवत ठेवावी.
मनातल्या मनात गुणगुणत रहावी.
कवितांचे छंद, चालीचं सौंदर्य आठवत रहावं.
आठवत आठवत फक्त बसावं.

मनाच्या कोलाहलाला प्रतिसाद देत,
हृदयाच्या स्पंदनांना आश्वासनं देत,
भावनांच्या आवेगाला विश्राम देत, फक्त बसावं.

निवांत. पोकळ. रितं. शून्य.

Image source - TinyBuddha

EDIT : हा लेख (कविता वगैरे म्हणावं कि नाही अशा संभ्रमात आहे मी अजून!) वाचून झाल्यावर माझ्या 'कपिल जगताप' नावाच्या मित्राने त्याने काढलेला एक उत्कृष्ट फोटो मला पाठवला. विषयाला अगदी अनुरूप फोटो सापडल्याने लागलीच हा फोटोसुद्धा upload करावा असा विचार माझ्या मनात आला, आणि मी तो केलासुद्धा!
19 comments:

 1. Replies
  1. अनेक धन्यवाद!
   ब्लॉगवर स्वागत; अश्याच ब्लॉगला भेट देत रहा.

   Delete
 2. छान. डोळ्यासमोर आलं सगळं..

  ReplyDelete
  Replies
  1. हीच खरी पावती!! खूप धन्यवाद!

   Delete
 3. Replies
  1. कल्पेश... तुला ब्लॉगवर पाहून बरं वाटलं. मनापासून धन्यवाद, आणि ब्लॉगला अशीच भेट देत रहा!

   Delete

Contact Form

Name

Email *

Message *