Tuesday, May 10, 2016

ग्रेस...!!



कवी ग्रेस यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या चपखल शब्दांच्या आणि गूढ अर्थाच्या कवितांचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. 'ग्रेस' या नावाने अजरामर कविता लिहिणाऱ्या या कवीचं खरं नाव 'माणिक गोडघाटे'. आजच्या दिवशी त्यांच्या एखाद-दोन कविता इथे लिहाव्या असं वाटलं म्हणून हि Blog-Post.


'या व्याकुळ संध्यासमयीं' आणि 'पाऊस कधीचा पडतो' ह्या माझ्या खूप आवडत्या कविता आहेत. ग्रेसांच्या कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अर्थ. प्रत्येक वाचनात नवा अर्थ उलगडणाऱ्या या कविता मला म्हणूनच आवडतात.


या व्याकुळ संध्यासमयीं
शब्दांचा जीव वितळतो.
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें
मी अपुले हात उजळतो.

तू आठवणींतुन माझ्या
कधिं रंगित वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं...

पदराला बांधुन स्वप्‍नें
तू एकट संध्यासमयीं,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई...

तू मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या काठीं
वळिवाचा पाऊस यावा !


वरवर पाहता संध्याकाळचं वर्णन आहे असं वाटणारी हि कविता खरंतर आयुष्याचा अर्थच सांगून जाते. कितीही वाचली तरी आपलं मन अतृप्त ठेवणारी अजून एक कविता म्हणजे 'पाऊस कधीचा पडतो'. 


पाऊस कधीचा पडतो 
झाडांची हलती पाने 
हलकेच जाग मज आली 
दु:खाच्या मंद सुराने 

डोळ्यात उतरले पाणी 
पाण्यावर डोळे फिरती 
रक्ताचा उडला पारा 
या नितळ उतरणीवरती 

पेटून कशी उजळेन 
हि शुभ्र फुलांची ज्वाला 
तार्‍यांच्या प्रहरापाशी 
पाऊस असा कोसळला 

सन्दिग्ध घरांच्या ओळी 
आकाश ढवळतो वारा 
माझ्याच किनार्‍यावरती 
लाटांचा आज पहारा



आपल्या कवितांबद्दल बोलताना ग्रेस एकदा म्हणाले होते कि, 'माझ्या कविता एखाद्या स्वगतासारख्या आहेत. मुळात स्वगतात अस्तित्वाच्या जाणीवेचा अभाव असतो. त्याला श्रोत्यांच्या अस्तित्वाची गरज नसते, किंवा ते आहेत याचं भानही नसतं. मी एक असा कवी आहे जो भाषेत नव्या शब्दांची निर्मिती करायलाही मागेपुढे पाहत नाही.' 



Image Source - Internet



ग्रेसांच्या कविता दुर्बोध आहेत. या कवितांचा अर्थ सामान्य माणसाला लवकर उमजत नाही. पण यामुळेच ग्रेसांच्या कविता स्पेशल ठरतात, वाचकाच्या मनात एक गहिरा तरंग उमटवून जातात.

19 comments:

  1. Pausachi bhari hoti ��������

    ReplyDelete
    Replies
    1. हो… मलाही खूप आवडते ती!

      Delete
    2. Khup jast mast👌👌👌👌

      Delete
  2. दोन्ही कविता मस्त आहेत,छान लिहिलय रजत...

    ReplyDelete
    Replies
    1. ग्रेस हा एक प्रवास आहे; आणि तो प्रवास त्याच्यानंतरही चालूच आहे. तो प्रवास समजून घेण्याचाच हा प्रयत्न.

      धन्यवाद दुर्गेश!

      Delete
  3. Waah.... chan lihilays. good going...

    ReplyDelete
  4. ग्रेस म्हणजे ग्रेट...

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय! काही माणसं हिमालयासारखी असतात. त्यांच्या Base campला जरी आपण स्पर्श केला तरी आपल्याला धन्य वाटतं.

      Delete
  5. surekh..... darweli vachatana nava arth ulagadat jato.... agadi kharay

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी!
      जादू आहे त्यांच्या शब्दांची...

      Anyway... ब्लॉगवर स्वागत! अश्याच भेट देत रहा.

      Delete
  6. Tuzya nimittane Grace yanchya kavita vachnyacha yog ala..je thodafar samjun gheta ala tyacha anand veglach ahe..dhanyawaad!

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा! म्हणजे माझा ब्लॉगचा उद्देश सफल झाला म्हणायचं...

      या विस्मयकारक ग्रेसजगतात स्वागत!!

      Delete

Contact Form

Name

Email *

Message *