Pages

Wednesday, June 12, 2019

Untitled post - 4


ओवी-आकृतिबंधात कधी लिहिलं नव्हतं. अचानक सुचलं, तेही ह्या आकृतिबंधात अजिबातच न बसणाऱ्या विषयावर.

ब्लॉगवर टाकण्यासाठी खरंतर नव्हतंच हे, पण बऱ्याच दिवसांत काही टाकलं नाही, म्हणून म्हणलं टाकावं...


सरेना कशी ही विरहरात
दग्ध-चंद्र झुरे नभात
धरणीच्या आत आत
गलबलून येई |

जाणीव एवढी मनात
दुःख आहे जन्मजात
राम नाही जीवनात
मिलनाविना |

दास आहे मी मनाचा
शोक वाहे दुर्लभाचा
विरहचित्ती शून्यदेही
भांबावलेला |


माहिती १ (गरज असलेली): पहिली ओवी 'ती'च्या नजरेतून, मधली दोघांच्या आणि तिसरी 'त्याच्या' नजरेतून आहे. वाचा परत!

माहिती २ (गरज नसलेली/उगाचच disclaimer): कुणावरतरी लिहिलेलं आहे, स्वतःच्या भावना नाहीत.

No comments:

Post a Comment